Youth arrested for chasing Trainee doctor girl | प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्यास अटक

प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्यास अटक

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी भागातील शिकवणी वर्गात जाणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाºया युवकास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. गोपाल इंगळे असे आरोपीचे नाव असून, तो भावी डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करीत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
सांगळूद येथील रहिवासी गोपाल अंबादास इंगळे (२४) हा युवक मोठ्या उमरीतील रहिवासी तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करीत होता. या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले; मात्र सदर युवक हा तरुणीला अश्लील हातवारे करीत असल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने ही माहिती तिच्या आईला दिली.
त्यानंतर याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (ड), ३४१, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. तर गोपाल इंगळे यानेही युवतीसह तिच्या आईविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी तक्रारीची नोंद केली आहे.

Web Title: Youth arrested for chasing Trainee doctor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.