शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं ट्विटर अकाउंंट बंद होणार आहे...व्हेरिफिकेशन कोड सांगा!

By atul.jaiswal | Updated: September 30, 2019 11:06 IST

'तुमचं ट्विटर  अकाउंट बंद होणार आहे, तुमच्या नंबरवर पाठविलेल्या ‘एसएमएस’मधील व्हेरिफिकेशन कोड सांगा’ अशी विचारणा करणारे फोन ‘नेटीझन्स’ना अज्ञात नंबरवरून येत आहेत.

ठळक मुद्देहे फोन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून येत आहेत. व्हेरिफिकेशन कोड सांगितल्यास तुमचे अकाउंट हॅक होऊन त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. तुमच्या नावे अश्लील संदेश पाठविणे, खंडणी मागणे, धमकावणे असे प्रकार होऊ शकतात.

- अतुल जयस्वालअकोला: बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम नंबर किंवा ओटीपी विचारून खात्यातील पैशांवर डल्ला मारणाऱ्या सायबर चोरटे किंवा हॅकर्सनी आता चक्क ट्विटर  अकाउंट हॅक करून त्याचा दुरुपयोग करण्याची शक्कल लढविली आहे. ‘तुमचं ट्विटर  अकाउंट बंद होणार आहे, तुमच्या नंबरवर पाठविलेल्या ‘एसएमएस’मधील व्हेरिफिकेशन कोड सांगा’ अशी विचारणा करणारे फोन ‘नेटीझन्स’ना अज्ञात नंबरवरून येत आहेत. असा फोन आल्यास सावधगिरी बाळगून कोणताही ओटीपी किंवा कोड सांगू नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.आॅनलाइन व डिजिटलायझेनच्या या काळात सायबर हॅकर्स, चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, विविध क्लृप्त्या योजून हे चोरटे बँक खात्यांमधून लाखो रुपयांना गंडा घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. सायबर चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा आता चक्क टिष्ट्वटर अकाउंट हॅक करण्याकडे वळविला आहे. गत काही दिवसांपासून शहरात अनेकांना ‘टिष्ट्वटर’मधून बोलत असल्याचे फोन येत आहेत. ‘तुमचे टिष्ट्वटर अकाउंट बंद होणार आहे, सुरू ठेवायचे असेल, तर तुमच्या मोबाइलवर पाठविलेला कोड सांगा’, अशी विचारणा केली जात आहे. हे फोन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून येत आहेत. ट्विटर कडून अशाप्रकारचे कोणतेही फोन केले जात नसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. फोन करणाºयाला व्हेरिफिकेशन कोड सांगितल्यास तुमचे अकाउंट हॅक होऊन त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.फोन क्रमांक परराज्यातीलसायबर चोरटे हे प्रामुख्याने परराज्यातील आहेत. हे फोन क्रमांक पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यांमधील असल्याने त्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे.कोड सांगण्याचा आग्रहट्विटरमधून बोलत असल्याचे सांगणारी व्यक्ती फोनवर पाठविलेला व्हेरिफिकेशन कोड सांगण्याचा आग्रह करते. तसेच एसएमस आलेल्या क्रमांकावर रिप्लाय करू नका, यावरही फोन करणाºयाचा भर असतो. कोड सांगितला नाही, तर तुमचे अकाउंट बंद करू, अशी धमकीही फोन करणारी व्यक्ती देत असल्याचा नेटीझन्सचा अनुभव आहे.असा होऊ शकतो दुरुपयोगतुमचे ट्विटर  अकाउंट हॅक केल्यानंतर त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. तुमच्या नावे अश्लील संदेश पाठविणे, खंडणी मागणे, धमकावणे असे प्रकार होऊ शकतात.

 

टॅग्स :Akolaअकोलाcyber crimeसायबर क्राइमTwitterट्विटरonlineऑनलाइन