डाबकी रोडवरील युवकास बेदम मारहाण

By Admin | Updated: October 12, 2015 02:01 IST2015-10-12T02:01:35+5:302015-10-12T02:01:35+5:30

मारहाणीत युवकाच्या पायाला गंभीर दुखापत; गुन्हा दाखल.

The young man on the dabki road suffocated | डाबकी रोडवरील युवकास बेदम मारहाण

डाबकी रोडवरील युवकास बेदम मारहाण

अकोला : डाबकी रोडवरील रहिवासी रोहित कागने या युवकास याच परिसरातील चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या मारहाणीत युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डाबकी रोडवरील गजानन कटारे याने त्याची दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. याच परिसरातील रहिवासी रोहित गणेश कागने याने त्याला रस्त्यावरील दुचाकी बाजूला घेण्याची विनंती केली असता गजानन कटारे याने तीन साथीदारांना सोबत घेऊन रोहितला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोहितच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रोहितच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी गजानन कटारे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The young man on the dabki road suffocated