शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

होय.. माझ्या भूमिकेला बंडही समजू शकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:47 IST

अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.

ठळक मुद्देखासदार नाना पटोले यांची परखड भूमिकानारायण राणेंचे बंड पदासाठी, माझे जनतेच्या भल्यासाठी!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न  दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून  कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.  या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविले आहे;  परंतु त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे चित्र दिसत  असल्याने मला मैदानात उतरावे लागले. त्याला तुम्ही बंड  म्हणत असाल, तर म्हणू शकता, अशी परखड भूमिका चंद्र पूरचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी रविवारी येथे  ‘लोकमत’शी बोलताना घेतली.शेतकरी जागर मंचाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्याला  उपस्थित राहण्यासाठी खासदार पटोले अकोला येथे आले  होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका  परखडपणे मांडली. आम्ही जनतेमध्ये अनेक आश्‍वासने  दिली होती. काळे धन आणणार; पण ते आले नाही.  नोटाबंदीला जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला; पण जे स्व प्न दाखविले, ते पूर्ण झालेच नाही. नंतर जीएसटी आल्यामुळे  एकट्या महाराष्ट्रातील पाच हजार उद्योग बंद पडले.  बेरोजगारी पराकोटीला गेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या  वाढत आहेत; पण कर्जमाफीचा निर्णय घेताना शासनाच्या  नवनवीन बोटचेपे धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा  सूर आहे. देशात २५0 जिल्हय़ांत दुष्काळी स्थिती असून,  १५0 जिल्हे पाण्याखाली आहेत. विदर्भ, मराठवाडा,  महाराष्ट्रात हेच चित्र आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे.  त्यांचे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो असून, पंतप्रधान,  पक्षप्रमुख यांना काय वाटते ते वाटू द्या, मी मात्र माझा लढा  सुरू च ठेवणार असून, लोकसभेत याचा जाबही अर्थमंत्र्यांना  विचारणार असल्याचे ते म्हणाले. २५ सप्टेंबरपासून दिल्लीत  पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीला तुम्ही जाणार  का, या प्रश्नादाखल त्यांनी आपण जाणार नसल्याचे सांगि तले. मतदारसंघात अनंत कामे असून, दुर्गा महोत्सवही  आहे. त्यामुळे मला सध्या येथे राहणे महत्त्वाचे वाटते, असेही  ते म्हणाले. तुमच्या या चळवळीत पक्षातील कोण कोण  आहे, यावर त्यांनी बरेच जण सोबत असल्याचे अधोरेखित  केले. मी बोलल्यानंतर अनेक जण आता बोलू लागल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी काळात राज्यात शेती,  शेतमूजर, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन लढणार आहोत. तद्व तच वैचारिक परिवर्तनासाठी आपण नव्याने प्रयत्न करणार  असून, एकोपा कसा निर्माण करता येईल, यासाठीचे प्रयत्न  करणार असल्याचे ते म्हणाले.