शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 1:15 PM

शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे.

अकोला : गतवर्षीच्या अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, यावर्षीच्या खरीप हंगामात या पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे. यादृष्टीने कृषी आयुक्तालयानेही पुढाकार घेतला आहे.सोयाबीनचे राज्यात सर्वसाधारण ३५ लाख ५३ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. या वाढणाºया क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्यांची गरज भासणार आहे; परंतु गतवर्षी उशिरा पाऊस आला आणि काढणीच्या वेळीही सतत पाऊस सुरू होता परिणामी सोयाबीनचे उत्पादन घटले असून, गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. म्हणूनच बियाणे उत्पादन क्षेत्रावर उत्पादित बियाणे आणि गत दोन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाण्यांची जी पेरणी केली होती. ते उत्पादित बियाणे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने राज्यातील शेतकरी पेरणी करतात ते सरळ वाण आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे हे बियाणे बदलण्याची गरज नाही. प्रमाणित बियाणे शेतकºयांनी पेरणी केल्यास उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते, असा कृषी विभागाचा दावा आहे. त्यासाठी यातील चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा चाळणी करू न निवड करणे तेवढेच गरजेचे आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचे बाह्यावरण नाजूक व पातळ असते त्यामुळे शेतकºयांना हाताळणी करताना काळजी घ्यावी लागणार आहे. हे बियाणे प्लास्टिक पोत्यात साठवू नये. साठवण करण्यापूर्वी बियाणे दोन दिवस उन्हामध्ये ठेवून त्यातील आर्द्रता ९ ते १२ टक्के आणणे तेवढेच महत्त्वाचे आहे. साठवून ठेवलेल्या ठिकाणी किंवा खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा तसेच उंदराचा उपद्रव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पेरपूर्वी घरीच बियाण्यांची उगणवशक्ती तपासून घेणे क्रमप्राप्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाणे उपलब्धतेची व्याप्ती वाढावी व तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शेतकºयांनी यावर्षी काळजी घ्यावी लागणार आहे.

गतवर्षीच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झालेला असल्याची शक्यता असल्याने या बियाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी घरचे व स्थानिक बियाणे वापरावे लागेल. त्यादृष्टीने शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज आहे.- विजय घावटे,कृषी संचालक,निविष्ठा व गुण नियंत्रण,कृषी आयुक्तालय, पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती