यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:22+5:302021-07-16T04:14:22+5:30
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार संसर्गाचा वृद्धीदर कमी ...

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार संसर्गाचा वृद्धीदर कमी असलेल्या जिल्ह्यात अकोल्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. ९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात शहरातील राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते; परंतु देवस्थान बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जात आहे.
व्यावसायिक म्हणतात...
शहरातील सर्व मंदिरे बंद आहेत. यासोबत लग्न सोहळे, कार्यक्रमही कमी प्रमाणात सुरू आहेत. आता निर्बंध शिथिल झाले असून, त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहेत; परंतु मंदिरे बंद असल्याने अपेक्षित व्यवसाय होत नाही. मंदिरे उघडल्यास व्यवसाय पूर्ववत होईल.
- राजू गायधने, फुलविक्रेता
मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे. मंदिर बंद असल्याने व्यवसाय केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूजा साहित्य खरेदी करावयाचे असल्यास एखादे-दोन ग्राहक येतात.
- अशोक अंबारखाने, पूजा साहित्य विक्रेता
श्रावण सोमवार
पहिला
९ ऑगस्ट
दुसरा
१६ ऑगस्ट
तिसरा
२३ ऑगस्ट
चौथा
३० ऑगस्ट
पाचवा
६ सप्टेंबर
९ पासून श्रावण
यावर्षी ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात शहरातील मंदिरांमध्ये पूजाअर्चा होते. शहरातील राजराजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे मंदिर परिसरातील व्यावसायिकांची आर्थिक उलाढालही वाढत असते. तसेच खेड्यापाड्यातूनही काही व्यावसायिक बेल, फुले व पूजा साहित्याची विक्री करण्यासाठी येतात.