शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

 यंदा समाधानकारक पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:09 PM

राज्याच्या इतर भागातही पोषक वातावरण असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी शुक्रवारी खास लोकमतशी बोलताना वर्तविला.

अकोला: वºहाडातील अकोला जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात आले. हे तापमान मान्सूनला पोषक ठरणार आहे. राज्याच्या इतर भागातही पोषक वातावरण असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.एन. साबळे यांनी शुक्रवारी खास लोकमतशी बोलताना वर्तविला.खासगी हवामानशास्त्र विभागांनी वर्तविलेल्या अंदाजानंतर डॉ. साबळे यांनी शेतकऱ्यांना ही आनंदाची माहिती दिली. मागील काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण घटले असून, मागील दोन वर्षांपासून तर हे प्रमाण खूपच कमी झाले. या पृष्ठभूमीवर यावर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तथापि, यावर्षी ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने मान्सूनवर त्यांचा प्रतिकूल परिणाम होण्याच्या शक्यताच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी धास्ती घेतली म्हणूनच आपणही यावर्षीच्या हवामानाचा अभ्यास केला असता एल निनोचा देशावर कोणताही परिणाम जाणवणार नसून, मान्सूनला वातावरण अनुकूल असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.वर्तमान स्थितीत हवेचा दाब कमी होण्यास सुरुवात झाली असून, भिरा, अकोला, मालेगाव, चंद्रपूर येथील कमाल तापमान ४२ ते ४३ अंशांच्या पुढे नोंदविले जात आहे. या चारही शहरातील कमाल तापमान गेले १० ते ११ दिवस सातत्याने सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले असून, हे तापमान दमदार पावसासाठी पोषक असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अरबी समुद्रावरून वारे वाहू लागले आहेत. अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वाºयाचा प्रवास सुरू झाला असून, नैर्ऋत्य दिशेने वारे वाहत असल्याने राज्यात समाधानकारक पावसाबरोबरच मान्सूनदेखील वेळेवरच दाखल होणार आहे. समाधानकारक पाऊस पडेल, हा पूर्व अंदाज असून, १५ मेनंतरच राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस पडेल, याबाबतचा तपशील कळू शकेल, असेही डॉ. साबळे म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानRainपाऊस