शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:44 IST

यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी. बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे.समाजमाध्यमांवर भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत मोठ्या प्रमाणात संदेश फिरत आहे.

अकोला : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना त्याचा फटका होळीलाही बसणार आहे. यंदा चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने ‘कोरोना’मुळे गत तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत; मात्र होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत असून, बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे, त्यामुळे यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.दरवर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते; परंतु यावेळी कोरोनामुळे आयातीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांनी मुंबई, दिल्ली, सुरत या ठिकाणांहून ठोक उत्पादने विक्रीसाठी मागविली आहेत. भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते; परंतु यंदा कोरोनामुळे या उत्पादनांना ब्रेक लागला असून, बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचीच संख्या जास्त आहे.कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवरदेखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असतात; परंतु आता परिस्थितीत बदल झाला आहे. असे असले तरी यंदा होळीच्या बाजारपेठेत मंदी राहणार असल्याचेही काही व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

समाजमाध्यमांमध्येही सुरू आहे जागृतीसमाजमाध्यमांवर भारतीय उत्पादने खरेदी करण्याबाबत मोठ्या प्रमाणात संदेश फिरत आहे. चिनी रंगामुळे होणारे परिणाम, चीन-भारत संबंध याला आता करोनाची जोड मिळाली असल्याने ‘नेटकरी’ देशी होळी साठी समाजमाध्यमांवर जागृती करताना दिसत आहे. यामुळेही आधीच बाजारपेठेत उपलब्ध असलेली चिनी उत्पादने कमी प्रमाणात विकली जात आहेत.

कोरड्या रंगाला पसंती‘कोरोना’ची भीती पसरल्याने ओल्या रंगाऐवजी कोरड्या रंगाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे यंदा व्यापाºयांनी होळीच्या ओल्या रंगाऐवजी कोरडा रंग जास्त प्रमाणात बाजारपेठेत विक्रीला आणला आहे.

चीनमधून येणाºया साहित्याची आयात ठप्प झाल्याने भारतीय उत्पादकांच्या उत्पादनाला मागणी वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा होळीचे रंग व पिचकारीच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे ग्राहक कोरड्या रंगाला पसंती देत आहेत.- मोहम्मद वसीम, रंग विक्रेता, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोनाHoliहोळी