मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचा यात्रा महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:14+5:302021-01-20T04:20:14+5:30

श्री संत गजानन महाराजांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या यात्रा महोत्सवात खंड पडू नये यासाठी गजानन महाराज पादुका संस्थानच्या विश्वस्त ...

Yatra Festival of Gajanan Maharaj Paduka Sansthan at Mundgaon canceled | मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचा यात्रा महोत्सव रद्द

मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचा यात्रा महोत्सव रद्द

श्री संत गजानन महाराजांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या यात्रा महोत्सवात खंड पडू नये यासाठी गजानन महाराज पादुका संस्थानच्या विश्वस्त मंडळ तसेच मोजक्या सेवाधारींच्या उपस्थितीत दि. २१ जानेवारी रोजी यात्रा सप्ताहास प्रारंभ होत आहे. या दरम्यान, रोज सकाळी ५ ते ६ काकडा, सायं ६ ते ७ हरिपाठ असणार आहे. गुरुवारी (दि. २१) दुपारी १ वाजता भक्त निवासाचे भूमिपूजन, श्री झामसिंग महाराज संकुलमध्ये आहे तसेच डॉ. निखिल धांडे यांचे तपासणी शिबिर दुपारी २ ते ५ पर्यंत असणार आहे.

रविवारी (दि. २४) डॉ. पार्थ, डाॅ. प्रिया चिमा यांचे तपासणी शिबिर, सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवादरम्यान निबंध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे. गुरुवारी (दि. २८) पौष पौर्णिमेला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. (फोटो)

Web Title: Yatra Festival of Gajanan Maharaj Paduka Sansthan at Mundgaon canceled