यशोदाबाई सहादेवराव हिवराळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST2021-05-19T04:18:38+5:302021-05-19T04:18:38+5:30

-------------------- निधन वार्ता अन्नपूर्णा श्रीराम अत्तरकार पातूर : येथील अन्नपूर्णा श्रीराम अत्तरकार (७६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. ...

Yashodabai Sahadevrao Hivarale passed away | यशोदाबाई सहादेवराव हिवराळे यांचे निधन

यशोदाबाई सहादेवराव हिवराळे यांचे निधन

--------------------

निधन वार्ता

अन्नपूर्णा श्रीराम अत्तरकार

पातूर : येथील अन्नपूर्णा श्रीराम अत्तरकार (७६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. त्या स्वातंत्र्य सैनिक स्व. श्रीराम अत्तरकार यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आणि सुना, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. (फोटो)

------------------

रामदास इंगळे

खानापूर : पातूर येथील रामदास सीताराम इंगळे (६७) यांचे दि. १६ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-------------------------------

वंदना तायडे

खानापूर : पार्डी येथील वंदना दीपक तायडे (३५) यांचे दि. १६ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------------------------

आँल इंडिया पँथर सेनेचे निवेदन

अकोटः राज्य सरकारने आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतानुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त जागा भरण्याचा घेतलेला अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करणे व अन्य मागण्या करीत ऑल इंडिया पँथर सेनेने तहसीलदारांना दि. १८ मे रोजी निवेदन दिले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष मंगेश तायडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप खडे, तालुका प्रवक्ते देवानंद इंगळे, पवन रजाने, तालुका महासचिव संतोष सोनोने, उमेश तायडे, सचिन गुरू, पंजाब धांडे, अजय डोंगरे, धम्मपाल पळसपगार, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

-----------------------------

वाडेगाव येथील सुव्यवस्थेबाबत निवेदन

वाडेगाव: येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात सुव्यवस्था ढासळली असल्याने येथील प्रहार सेवक यांच्याकडून दि. १७ मे रोजी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांना निवेदन देऊन सक्षम अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रहार सेवक राधेश्याम कळसकार, चेतन दशमुखे, नामदेव कराळे, सुनील पिंपळे, शिव कळसकार, राजेंद्र पल्हाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Yashodabai Sahadevrao Hivarale passed away