वरली अड्ड्यावर धाड; ३२ जणांना अटक
By Admin | Updated: July 7, 2017 01:34 IST2017-07-07T01:34:53+5:302017-07-07T01:34:53+5:30
महान येथे विशेष पथकाची कारवाई

वरली अड्ड्यावर धाड; ३२ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : तालुक्यातील महान येथील पठाण नामक इसमाच्या वरली अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून, ३२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह ५७ हजार रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महान येथे पठाण नावाचा व्यक्ती वरली अड्डा चालवत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने ६ जुलै रोजी धाड टाकून ३२ जणांना अटक केली. कारवाई केलेल्या डिगांबर मानकर, वसीम बेग, महादेव नागे, अब्दुल अनिस, संतोष पवार, आरिफ खान, शेख अजीज, बाबूराव पातोंड, बाळू सावळे, रामदास सावळे, गजानन जाधव, काजीमुद्दीन, मकसूद खान, शेख इकबाल, दिलीप चक्रनारायण, ज्ञानेश्वर नागे, शेख शकील, सलीम खान, हरिदास कुरकुटे, विनोद जाधव, लक्ष्मण चव्हाण, गुलाब ढवळे, कैयूम खान, विजय आड़े, डिगांबर ठाकरे, डिगांबर तायड़े, मोहन नागे, श्रावण डाबेराव, प्रवीण तिवले, कैलाश झलके, सुरेश चव्हाण आणि अरुण सावंत यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने केली.