नदीपात्रात उडी घेऊन इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: August 20, 2016 02:42 IST2016-08-20T02:42:17+5:302016-08-20T02:42:17+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; पैनगंगा नदीपात्रात घेतली उडी.

नदीपात्रात उडी घेऊन इसमाची आत्महत्या
वाशिम,दि १९ : वाशिम येथील शुक्रवार पेठेतील राजू नारायण चोळे या ४0 वर्षीय इसमाने कनेरगाव नाका नजीकच्या पैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून राजू चोळे हे वाशिम येथून कनेरगाव नाका येथे गेले होते. तेथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळ दुचाकी उभी करून त्यांनी पाण्यात उडी मारली. हा प्रकार यावेळी रस्त्याने जाणार्या काही वाहनचालकांनी बघितला. पाण्यात बुडत असल्याचे पाहत काहींनी पुलावरून दोरी फेकून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये यश आले नाही. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान संगमेश्वर मंदिर परिसरात पैनगंगेत पोहत असलेल्या युवकांनी राजू चोळे याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र ते त्याला वाचवू शकले नाही. याप्रकरणी पोलीस स्टेशन व घरच्या मंडळींना माहिती देण्यात आली. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.