शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:31 IST

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्या कडे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत.

अकोला : श्रम, बुद्धी, गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वत:च आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मागार्तील अडसर दूर करावे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्याकडे  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टीकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे. नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुभार्वा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले. कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत. जगातील अनेक प्रगत देशांत बीटी चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला उत्पादकताही प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकºयांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्या चे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा भावना शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्फत सरकारला कळविल्या. यावेळी सोशल मेडिया प्रमुख विलास ताथोड, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील,शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीHansraj Ahirहंसराज अहिर