आरटीओ पासिंगच्या बनावट दस्तावेजाद्वारे आठ लाखांनी गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:56 IST2017-08-25T00:56:29+5:302017-08-25T00:56:41+5:30

रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडेलवाल  मारोती शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका टीम लीडरने   १६  ग्राहकांच्या वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)  पासिंग व रजिस्ट्रेशन शुल्काचे बनावट दस्तावेज तयार करून  शोरूम मालकाला तब्बल १६ लाखांनी गंडविल्याचा प्रकार  गुरुवारी समोर आला. याप्रकरणी कुणाल संतोष पांडे याच्याविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली  आहे.

Written documents of RTO passing eight lakhs! | आरटीओ पासिंगच्या बनावट दस्तावेजाद्वारे आठ लाखांनी गंडा!

आरटीओ पासिंगच्या बनावट दस्तावेजाद्वारे आठ लाखांनी गंडा!

ठळक मुद्देटीम लीडरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाखंडेलवाल शोरूममधील  प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडेलवाल  मारोती शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका टीम लीडरने   १६  ग्राहकांच्या वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)  पासिंग व रजिस्ट्रेशन शुल्काचे बनावट दस्तावेज तयार करून  शोरूम मालकाला तब्बल १६ लाखांनी गंडविल्याचा प्रकार  गुरुवारी समोर आला. याप्रकरणी कुणाल संतोष पांडे याच्याविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली  आहे.
 आलोक वसंतराव खंडेलवाल यांचे खंडेलवाल मारोती शोरूम  आहे. या शोरूममध्ये न्यू तापडिया नगरातील रहिवासी कुणाल सं तोष पांडे हा टीम लीडर म्हणून गत १0 वर्षांंपासून कार्यरत आहे.  कुणाल पांडे याच्याकडे ग्राहकांना कार दाखविणे, त्यांच्या कारचे  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पासिंग करून आणणे आणि  रजिस्ट्रेशन करून आणण्याची जबाबदारी होती.  हे काम करीत  असताना त्याने ४ ऑगस्टपूर्वी  शोरूममधून कार घेतलेल्या  १६  ग्राहकांच्या कारचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पासिंग न  करता तसेच रजिस्ट्रेशनही न करता १६ कारच्या पासिंगचे व  रजिस्ट्रेशनचे बनावट दस्तावेज तयार के ले व   ८ लाख २४ हजार  रुपयांची रक्कम हडपली. हा प्रकार   संचालक आलोक खंडेलवाल  यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ  पोलीस ठाण्यात केली. रामदासपेठ पोलिसांनी चौकशी केली अस ता त्यामध्ये कुणाल पांडे याने ग्राहक व खंडेलवाल शोरूमच्या  संचालकांची आठ लाखांनी फसवणूक केल्याचे समोर आले.  यावरून कुणाल संतोष पांडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दा खल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आरो पीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने कुणाल पांडे  याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
-
 

Web Title: Written documents of RTO passing eight lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.