मृतक महिलेची सही करून बनविले बनावट संमती पत्र
By Admin | Updated: July 9, 2014 00:33 IST2014-07-09T00:33:40+5:302014-07-09T00:33:40+5:30
पतीने मृतक झालेल्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करू न विहिरीसाठी संमती पत्र तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मृतक महिलेची सही करून बनविले बनावट संमती पत्र
अकोला : पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील एका बहाद्दर पतीने मृतक झालेल्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करू न विहिरीसाठी संमती पत्र तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पातूरचे न्यायाधीश पी.एम.बडिगी यांनी दिले.
अजय जयवंत देशमुख यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत अनिल यशवंत देशमुख, प्रमोद प्रीतम खुळे, मंगलचंद सुहालाल जैन व शामसिंग कन्हीराम चव्हाण यांना प्रतिवादी केले आहे. अनिल देशमुख यांनी त्यांच्या मालकीचे शेत २00१ मध्ये प्रमोद खुळे यांना विकले होते. यावेळी खरेदीखतामध्ये विहिरीचा कोणताही उल्लेख नव्हता. ही विहीर वडिलोपाजिर्त असल्यामुळे अजय देशमुख यांनी या विहिरीवर दावा केला आहे. या शेतीविषयी आपली बाजू सुरक्षित व्हावी म्हणून अनिल देशमुख यांनी १२ जून २00३ रोजी खुळे यांना विहीर खरेदी करू न देण्यासाठी संमती लेख तयार केला. या संमती लेखावर अनिल देशमुख व यांची पत्नी विजया अनिल देशमुख यांची स्वाक्षरी आहे. या व्यवहारासाठी उपयोगात आणण्यात आलेल्या मुद्रांकाचा क्रमांक ३३५४ असा असून, तो १२ जून२00३ रोजी विजया देशमुख व अनिल देशमुख यांच्या नावाने खरेदी केलेला असून, तो पातूर उपकोषागार कार्यालयाचा आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे विजया देशमुख ५ नोव्हेंबर १९८२ रोजीच मयत झालेल्या आहेत. सन २00३ मध्ये झालेल्या संमती लेखावर विजया देशमुख म्हणून सही कोणत्या महिलेने केली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मयताचा दाखला व बनावट संमती लेख हे दोन्ही दस्ताऐवजासह अजय देशमुख यांनी १४ मे २0१४ रोजी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने अजय देशमुख यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पातूर न्यायालयाने सदरहू प्रकरणात १२0 ब कट रचणे, ४0६, ४१७,४२0,४६८,४७१ ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे सांगितले.या प्रकरणात अर्जदाराच्यावतीने अँड. राजेश जाधव व अँड. मिश्रा यांनी काम पाहिले.