शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मातीवर रेघोट्या ओढणाऱ्या हातात लेखन-पाटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 15:49 IST

शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य देत शाळा प्रवेशित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या माय-बापाच्या मागे शेतात दिवसभर मातीवर रेघोट्या ओढत बालपण जगणाºया राहुल व चांदणीच्या हातात लेखन-पाटी आल्याने त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे.अमरावती जिल्ह्यातून रोजगाराचा शोध घेत खंडाळा शेतशिवारात अनेक कुटुंबे दाखल होत आहेत. यातील दादू जांभेकर यांच्या राहुल व चांदणी या लेकरांना ८ नोव्हेंबर रोजी जि. प. व. प्राथमिक शाळा खंडाळा ता. तेल्हारा येथे प्रवेश देण्यात आला. या प्रवेशप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य देत शाळा प्रवेशित केले.या सत्रात खंडाळा येथील शाळेत बालरक्षक व ‘सेव्ह बचपन’चे जिल्हा समन्वयक तुलसीदास खिरोडकार व सहकारी शिक्षकांनी पुढाकार घेत दहा शाळकरी शाळाबाह्य मुलांना वयानुरूप प्रवेश मिळवून देत शाळा प्रवाहात आणले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, नितीन सुदालकर जि. प. वरिष्ठ सहायक, जिल्हा समन्वयक प्रशांत अंभोरे, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे यांनी केंद्र शाळा खंडाळाची तपासणी करून शालेय कामकाजाचे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक केले.दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये वाचन आवड निर्माण व्हावी, या हेतूने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वाचनालयाचा शुभारंभ शिक्षणाधिकारी ठग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिनकर धूळ, संतोष वैतकार, ‘सेव्ह बचपन’चे विनोद राठोड, सचिन वावरकार, मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिºहे, कपिल इंगळे व तुलसीदास खिरोडकार यांची उपस्थिती होती.

आतापर्यंत दहा मुलांना दिला प्रवेश!रोजगारासाठी भटकंती करणाºया मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. राहण्याचे ठिकाण स्थिर नसल्याने या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना वयानुसार शाळेत प्रवेश देण्याची मोहीम बालरक्षक व ‘सेव्ह बचपन’च्यावतीने राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत दहा मुलांना प्रवेश देण्यात आला आहे.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची संधी द्या!शाळाबाह्य मुलांना शालेय शैक्षणिक प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासनाने शिक्षण विभागासोबत अनेक संस्था कार्यरत आहेत. आपणही आपल्या परिसरात शाळाबाह्य मुलांची दखल घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘सेव्ह बचपन’ या संस्थेसह शिक्षणाधिकारी यांच्याशीही अशा मुलांच्या प्रवेशाबाबत संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी