शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा घटनेचे पश्‍चिम वर्‍हाडात पडसाद : अकोला, बुलडाणा, खामगावात बसेसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:27 IST

अकोला/वाशिम/बुलडाणा/खामगाव: पुणे जिल्हय़ातील कोरेगाव - भीमा येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अकोला, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, वाशिम या मोठय़ा शहरांमध्ये संतप्त युवकांनी बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवाशिम जिल्हय़ात बंद, बसवर दगडफेक बुलडाण्यात एसटी बसवर दगडफेक     

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/वाशिम/बुलडाणा/खामगाव: पुणे जिल्हय़ातील कोरेगाव - भीमा येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अकोला, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, वाशिम या मोठय़ा शहरांमध्ये संतप्त युवकांनी बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय खामगाव, अकोला जिल्हय़ातील लोहारा, अकोट, वाशिम जिल्हय़ातील कनेरगाव नाका येथे परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. लोहारा येथे बसवर झालेल्या दगडफेकीत दोन चिमुकल्यांसह पाच जण जखमी झाले. बुलडाणा शहरात संतप्त युवकांनी बाजारपेठ बंद करण्यासाठी शहरातून मोर्चा काढला, तसेच बसस्थानकावर ठिय्या आंदोलन केले. अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या ३४ जणांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. तेल्हार्‍यात युवकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. बाळापूर येथेही पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.  परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला होता. 

वाशिम जिल्हय़ात बंद, बसवर दगडफेक कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दगडफेकीच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पृष्ठभूमीवर व्यावसायिकांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन दुपारी १ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळला.  या घटनेचे पडसाद कनेरगाव येथे उमटले. वाशिमपासून जवळच असलेल्या तथा हिंगोली जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या कनेरगाव येथे सोमवारी सायंकाळी एका बसची काच फोडल्यानंतर मंगळवारी पुन्हा सकाळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन, निदर्शने केली. यावेळी तीन बसेस आणि एका खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम येथे एका वाहनावर दगडफेक झाली. अज्ञात इसमांनी अकोला नाका चौकात टायर जाळला. 

बुलडाण्यात एसटी बसवर दगडफेक      कोरेगाव-भीमा  येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ९ बसेस फोडल्या. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसेसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसेसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्‍या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणwashimवाशिमbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगावBhima-koregaonभीमा-कोरेगाव