शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

World Blood Donor Day : कोविडच्या संकटातही रक्तदात्यांनी तारले रुग्णांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:08 AM

World Blood Donor Day : शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते.

ठळक मुद्देऑनकॉल रक्तदानामुळे बचावला अनेकांचा जीव दर दिवशी सुमारे ४५०० ते ५००० गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासते.

अकोला: गत वर्षभरात कोविडच्या दोन लाटा येऊन गेल्या. त्याचा गंभीर परिणाम रक्त संकलनावर झाला. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरेही गरजेनुसार झाले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या रक्तपेढ्यांमध्ये तीन ते चार दिवस पुरेल येवढाच रक्तसाठा शिल्लक राहिल्याची स्थिती मागील वर्षभरापासून आहे. अशा संकटाच्या काळात ऑनकॉल रक्तदान करुन रक्तदात्यांनी अनेकांचे प्राण वाचविले. कोरोनामुळे नॉनकोविड वैद्यकीय उपचार प्रभावीत झाले होते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या, मात्र अपघातग्रस्तांसह थॅलेसिमिया, हिमोफिलिया या सारख्या आजाराच्या रुग्णांना नियमीत रक्ताची गरज भासते. परंतु, कोविडमुळे यंदा रक्तसंकलनात मोठ्या प्रमाणता घट झाली. त्याचा फटका या रुग्णांना बसला असून रक्तपेढ्यांमध्ये संकलीत रक्तही तीन ते चार दिवस पुरेल येवढेच उपलब्ध आहे. रक्तपेढ्यांमध्ये संकलीत रक्ताची उपलब्धता मर्यादीत असली, तरी ही कमी भरून काढण्यासाठी रक्तपेढ्यांनी ‘ऑनकॉल’ रक्तदानासाठी रक्तदात्यांना आव्हान करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गंभीर रुग्णांनी गरज असेल, तेव्हाच रक्तदात्यांकडून रक्तसंकलीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. रक्तदात्यांनीही त्याला प्रतिसाद देत गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविले.

राज्यात दिवसाला पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज

परिषदेच्या माहितीनुसार राज्यभरात दर दिवशी सुमारे ४५०० ते ५००० गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. अकोला शहरात येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

मोठ्या रक्तपेढ्या - ५

 

 

रक्तसंकलन

 

२०२० मध्ये १९, ९९८ युनिट

 

२०२१ मध्ये ९,४६१ युनिट

 

व्हॉट्स ॲप ग्रुपची महत्त्वाची भूमीका

 

कोविडच्या संकटात रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत भटकंती करावी लागली. अशा परिस्थितीत रक्तदात्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपनी महत्त्वाची भूमीका बजावली. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णाची संपूर्ण माहिती, त्याच्या नातेवाईकाचा संपर्क क्रमांक आणि त्याचा रक्तगट देताच रक्तदाते रुग्णाच्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या रक्ताची गरज भागवत आहेत. या माध्यमातूनही अनेकांचे प्राण वाचविण्यात रक्तदात्यांची मोठी भूमीका राहीली आहे.

 

पाच हजार युनिटने घटले रक्तसंकलन

गत काही वर्षांपासून सर्वाधिक रक्तसंकलन करणारी रक्तपेढी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी अव्वल स्थानी होती. ही रक्तपेढी वर्षाला १० हजारपेक्षा जास्त युनिट रक्तसंकलन करते, मात्र कोरोना काळात रक्तसंकलन प्रभावीत झाले. २०२० मध्ये केवळ ६ हजार युनिट रक्तसंकलीत करण्यात आले. तर जानेवारी २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत केवळ दोन हजार २२० युनिट संकलीत करण्यात आले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या रक्तपेढीत देखील सुमारे दोन हजार युनिट रक्तसंकलीत करण्यात आले.

 

मी आतापर्यंत ६५ वेळा रक्तदान केले, मात्र रक्तदान करताना रुग्णाच्या नातेवाईकांकडूनही रक्तदान करवून घेतले. अनेक जण आपल्या रुग्णासाठी रक्तदात्यांकडून रक्त संकलीत करतात, मात्र स्वत: रक्तदान करत नाही. अशा नातेवाईकांनीही रक्तदात्यासोबत रक्तदान करावे. जेणेकरून इतर गरजूंनाही रक्त पुरविण्यास मदत होईल.

- प्रभजितसिंग बच्छेर, सदस्य, रेडक्रॉस सोसायटी, अकोला

- कोरोनामुळे रक्तसंकलनाला मोठा फटका बसला आहे. रक्तदान शिबिरेही नेहमीच्या तुलनेत कमी झाले आहेत. कोरोना काळातही रक्तदान करणे सुरक्षीत आहे. रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक सर्वच खबरदारी घेतली जाते. त्यामुळे रक्तदात्यांनी न घाबरता रक्तदानास पुढे यावे.

- डॉ. अजय जुनगरे, विभागप्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाWorld Blood Donor Dayजागतिक रक्तदाता दिवस