जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘जीएसटी’वर कार्यशाळा!
By Admin | Updated: July 17, 2017 03:13 IST2017-07-17T03:13:37+5:302017-07-17T03:13:37+5:30
जीएसटी ( वस्तू व सेवा कर) कायद्याची कार्यशाळा १७ जुलै रोजी नियोजन भवनात ही होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘जीएसटी’वर कार्यशाळा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटी ( वस्तू व सेवा कर) कायद्याची अंमलबजावणी अकोल्यात काटेकोर करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला असून, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही कार्यशाळा होणार आहे. अकोला शहरातील कॉम्प्युटर डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिक, सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्या समस्यांचे निराकरण या कार्यशाळेतून केले जाणार आहे.
निमवाडीस्थीत जीएसटी कार्यालयाचे राज्य कर उपायुक्त एस.एन. शेंडगे यांनी अकोल्यातील विविध संघटनांच्या प्रमुखांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले केले. या कार्यशाळेत उपायुक्त गावंडे, सहायक उपायुक्त रमेश दळवी, सहायक उपायुक्त अमरजीत सेठी, जीएसटी अधिकारी अभिजित नागले, थोरात आदी प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. जीएसटी संदर्भात अजूनही अनेक संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये आहेत. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कर प्रणाली सुटसुटीत करण्यासाठी जीएसटी मैलाचा दगड ठरेल, असे आवाहनही उपायुक्त शेंडगे यांनी केले आहे. सोमवारी आयोजित या कार्यशाळेला व्यापारी-उद्योजकांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जीएसटी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.