मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फीत लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST2021-09-02T04:41:44+5:302021-09-02T04:41:44+5:30
रस्त्यालगतच्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपातील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असलेल्या फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला ...

मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फीत लावून कामकाज
रस्त्यालगतच्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपातील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असलेल्या फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये पिंपळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनपातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फीत लावून आंदोलन केले. दोषी फेरीवाल्याविराेधात कठाेर कारवाई व्हावी, याबाबतचे निवेदन प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. आंदोलनात मनपा कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले, विठ्ठलराव देवकते, अनुप खरारे, उमेश सटवाले, विजय पारतवार, उमेश लखन, योगेश मारवाडी, विजय सारवान, जी. आर. खान, ओम ताडम, आनंद अवशालकर, शांताराम निंधाने, गुरू सारवान, तसेच पूर्व झाेनमधील सहायक कर अधीक्षक देवेंद्र भोजने, कर वसुली लिपिक सुनील इंगळे, रमाकांत बगरेट, दिनेश लांडे, दीपराज महल्ले, राजेश साळुंखे, दादाराव सदाशिव, संतोष वेले, श्रीकृष्ण वाकोडे, रोखपाल मुहसर अहेमद, सुरक्षारक्षक संगीता शिंदे, आदींनी सहभागी हाेत निषेध व्यक्त केला.