कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगारांचा एल्गार

By Admin | Updated: September 3, 2015 01:57 IST2015-09-03T01:57:20+5:302015-09-03T01:57:20+5:30

सहभागी संघटनांनी व्यक्त केला रोष.

Workers' protest against the anti-worker policy | कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगारांचा एल्गार

कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगारांचा एल्गार

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी तसेच कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगारांच्या विविध दहा संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दरम्यान, विविध कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्काची मागणी केली. केंद्र शासनाने भूसंपादन कायद्यात सुधारणांच्या नावाखाली शेतकर्‍यांना देशोधडीला लावले, तर दुसरीकडे उद्योजकांना फायदेशीर ठरतील, असे बदल कामगारांच्या कायद्यात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सार्वजनिक बँका, विमा कंपनी आणि सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केल्या जात आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येत असल्याने शाश्‍वत हमीची पेन्शन गुंडाळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, सरकारी महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद करून खासगीकरण केल्या जात आहे. शासनाच्या या धोरणामुळे कामगारांचे अधिकार हिरवल्या जात आहेत.

Web Title: Workers' protest against the anti-worker policy