कार्यकर्त्यांची घुसमट; उमेदवारांचा दबाव वाढला
By Admin | Updated: October 3, 2014 01:34 IST2014-10-03T01:34:45+5:302014-10-03T01:34:45+5:30
राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

कार्यकर्त्यांची घुसमट; उमेदवारांचा दबाव वाढला
अकोला : कधीकाळी एकमेकांचे राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत. आजपर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, नेमका त्यांच्याच विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत आहे. त्यात भरीस भर उमेदवारांचा दबाव वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून, अनेकांनी प्रचारापासून चार हात लांब राहणे पसंत के ल्याचे चित्र तूर्तास पाहावयास मिळत आहे.
गत २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती व १५ वर्षे जुनी कॉँग्रसे-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी विधानसभा निवडणुकीत तुटली. यापूर्वी आघाडी- युतीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते समन्वयाने निवडणुकीत प्रचार करायचे. या समीकरणांचा दोन्ही पक्षातील उमेदवारांना फायदाच झाला. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरून युती व आघाडी तुटली. राजकीय सारिपाटावरील या विचित्र घडामोडींमुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता अद्यापही कायम असून ह्यकोणता झेंडा घेऊ हातीह्णअशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी निवडणुकीतून काही इच्छुकांनी नामांकन अर्ज (उमेदवारी) मागे घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे; परंतु कार्यकर्त्यांची घुसमट लक्षात न घेता किंवा दोन शब्द प्रेमाचे सोडून उमेदवारांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे.