कामाची मागणी करीत मजुरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!
By Admin | Updated: December 17, 2015 02:30 IST2015-12-17T02:30:47+5:302015-12-17T02:30:47+5:30
अकोला जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर; हजारो मजुरांचा मोर्चात सहभाग.

कामाची मागणी करीत मजुरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!
अकोला : बिल्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर अँन्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बांधकाम व्यावसायिक व मजुरांच्या रोजगाराच्या मुद्यावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी असोसिएशनतर्फे जिल्हाधिर्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात शेकडो बांधकाम मजूर सहभागी झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील रेती, गिट्टीच्या रॉयल्टीअभावी शहरातील बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे, तर बांधकामाशी निगडित प्रत्येक व्यावसायिक व मजुरास अवैध ठरवण्यात येत आहे. परिणामी जिल्ह्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात बिल्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर अँन्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बुधवार, १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अकोला क्रिकेट क्लब मैदानापासून मोर्चा काढण्यात आला असून, हा मोर्चा टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गे गांधी रोडवर पोहोचला. येथून तहसील चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचला. मोर्चामध्ये सहभागी शेकडो मजूर पाहता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.