आरोग्य कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
By Admin | Updated: July 14, 2014 00:18 IST2014-07-14T00:18:37+5:302014-07-14T00:18:37+5:30
जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक आरोग्य कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
अकोला - जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक आरोग्य कर्मचार्यांनी सोमवार, १४ जुलै रोजी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी हे कर्मचारी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यासंह शासकीय आरोग्य विभागातील हिवताप व हत्तीरोग विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एलएचव्ही पदांची भरती करणे, जिल्हा प्रशिक्षण पथकामध्ये २ एलएचव्ही पदे भरणे, आरोग्य सहाय्यक पदाचे ग्रेडवेतन २ हजार ८00 रुपये करणे, आरोग्यसेवक पदाची शैक्षणिक पात्रता एचएससी करून प्रशिक्षण कालावधी दोन वर्षांंचा करणे, आरोग्य सेवकाकडील डाटा एंट्री ऑपरेटर व एनआरएचएमची कामे बंद करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहय रुग्ण व आंतररुग्ण विभागात स्वतंत्र पदे भरणे, महिला आरोग्य सेविकांना एनआरएचएम सेवेत कायम करणे, आरोग्य कर्मचार्यांच्या पदनाम बदलाचे आदेश निर्गमित करणे, अर्धवेळ स्त्री परिचर यांना किमान वेतन १0 हजार रुपये लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचार्यांप्रमाणे वर्ग ४ च्या पदावर सामावून घेणे, औषध निर्माण अधिकारी या पदाची वेतनातील त्रुटी दूर करणे, डॉक्टर खानंदे समितीच्या अहवालानुसार आरोग्य पर्यवेक्षकांची पदे भरणे, हिवताप विभागात निवड समितीने निवड केलेल्या आरोग्य सेवकांच्या सेवा नियमित करणे, बंदपत्रीत आरोग्य सेवक यांच्या सेवा नियमित करणे यासह विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा आरोग्य कर्मचार्यांना दिला आहे.