वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST2021-05-18T04:20:20+5:302021-05-18T04:20:20+5:30
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन रखडली! पातूर: तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील वृद्धांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर ...

वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन रखडली!
पातूर: तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील वृद्धांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यांना मानधन देण्याची मागणी होत आहे.
प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचा लाभ द्या
निहिदा : पिंजर परिसरात प्रधानमंत्री जीवनदायी योजनेचे सर्वेक्षण करून त्याचा गोरगरीब रुग्णांना लाभ द्यावा, अशी मागणी पिंजर ग्रा.पं. सदस्या विजया गजानन गावंडे यांनी बार्शीटाकळी तहसीलदारांना सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे. प्रधानमंत्री जीवनदायी योजनेंतर्गत गोरगरीब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत विमा दिला जातो. ही गोरगरिबांसाठी फायद्याची आहे. मात्र, पिंजर येथील नागरिकांना योजनेची माहिती नाही व त्याचा लाभसुद्धा लोकांना मिळत नाही.
पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी गायब!
मूर्तिजापूर : तालुक्यातील १६५ खेड्यांशी संबंधित असलेल्या पुरवठा विभागात सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकही कर्मचारी, अधिकारी दिसून आला नाही. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पुरवठा विभाग कार्यालयात फेरफटका मारला असता, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दिसून आले.
ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
अकोला : डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी दर वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, सद्यस्थितीत मशागत ट्रॅक्टरद्वारे केल्या जात आहे.
शिरपूर परिसरात वृक्षतोड
खेट्री : आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत शिरपूर परिसरात वृक्षांची कत्तल होत असून, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले.
वन्य प्राण्यांचा हैदोस; शेतकरी रात्री राखणीला!
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तुदगाव रस्त्यावर अतिक्रमण; नागरिक त्रस्त!
तेल्हारा: तेल्हारा-तुदगाव रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून, रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
वाडेगाव परिसरात अवैध वृक्षतोड
वाडेगाव: परिसरात मागील अनेक दिवसांपासून तुलंगा-दिग्रस बु, चान्नी फाटा ते चान्नी जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वृक्षतोड सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षांची कत्तल केल्या जात असल्याने वृक्षप्रेंमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळला
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सस्ती शिवारातील रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने सिंचन रखडले आहे. विजेअभावी सिंचन रखडल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, शेतकरी चिंतित सापडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मूर्तिजापूर नगर परिषदेच्या दुकानात सुविधांचा अभाव
मूर्तिजापूर : नगर परिषदेच्या दुकानात सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा पालकमंत्र्यांच्या दरबारात माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी मांडला. निवेदनात नमूद केले की, मूर्तिजापूर नगरपालिका दर महिन्याला ३ लाख रुपयांपर्यंत भाडे वसूल करते. नगर परिषद भाडे वसूल करण्यात सक्षम आहे; पण दुकानदारांना सुविधा देण्यात येत नाहीत.