संत जगनाडे महाराज यांचे कार्य महान : संजय महाराज पाचपाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:51+5:302020-12-29T04:17:51+5:30

संताजी नगरस्थित संताजी जगनाडे महाराज मंदिरात शनिवारी आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या सोहळ्यात विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांनी ...

The work of Sant Jagannade Maharaj is great: Sanjay Maharaj Pachpar | संत जगनाडे महाराज यांचे कार्य महान : संजय महाराज पाचपाेर

संत जगनाडे महाराज यांचे कार्य महान : संजय महाराज पाचपाेर

संताजी नगरस्थित संताजी जगनाडे महाराज मंदिरात शनिवारी आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या सोहळ्यात विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी महाराज संस्थानचे अध्यक्ष गणेशराव रायपुरे होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, माणिकराव घाटे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अनिल वानखडे, अतुल साखरकर, विनोद नालट, विकास राठोड, ज्ञानेश्वर रायपुरे, राजेश साखरकर, राजेश पातळे, दीपक भिरड, सागर नायसे, ठाकूरदास चौधरी ,दिलीप शिरसागर, राजेश असलमोल, प्रमोद चोपडे, निलेश नवथळे, निलेश कपल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शेवतकर यांनी तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर रायपुरे यांनी केले. आभार विनोद नालट यांनी मानले. कार्यक्रमाला तेली समाज युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The work of Sant Jagannade Maharaj is great: Sanjay Maharaj Pachpar