रेडक्रॉस सोसायटीचे कार्य प्रशंसनीय-कर्नल पांडेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:24+5:302021-05-09T04:19:24+5:30

कार्यक्रमाच्या प्रारंभी रेडक्रॉस दिनानिमित्त मोफत रुग्ण तपासणी शुभारंभ कर्नल पांडेय यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या संधीचा अनेकांनी ...

The work of the Red Cross Society is commendable कर् Colonel Pandey | रेडक्रॉस सोसायटीचे कार्य प्रशंसनीय-कर्नल पांडेय

रेडक्रॉस सोसायटीचे कार्य प्रशंसनीय-कर्नल पांडेय

कार्यक्रमाच्या प्रारंभी रेडक्रॉस दिनानिमित्त मोफत रुग्ण तपासणी शुभारंभ कर्नल पांडेय यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या संधीचा अनेकांनी लाभ घेतला. कोषाध्यक्ष ॲड. महेंद्र साहू यांनी रेडक्रॉसचे मानचिन्ह देऊन मुख्य अतिथींचे स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ॲड. सुभाष मुंगी व डॉ. तजिन सय्यद यांनी एनसीसीसाठी कर्नल पांडेय यांना रेडक्रॉस सोसायटीचे मास्क स्वाधीन केले. डॉ. एन. के. माहेश्वरी यांनी आर्सेनिक एल्बम गोळ्या वितरणासाठी दिल्यात.

प्रारंभी मानद सचिव प्रभजितसिंह बछेर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर ॲड. सुभाषसिंह ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला एनसीसीचे सुभेदार जसविंदरसिंह, डॉ. श्रद्धा साहू, मंगला डोंगरे, पुष्पा डोंगरे, व्रजलाल काकू, रिची कोहली, मोहन काजळे आदींची उपस्थिती होती.

फोटो:

Web Title: The work of the Red Cross Society is commendable कर् Colonel Pandey