जितापूर येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:03+5:302021-05-06T04:20:03+5:30

त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खडीकरण केलेल्या रस्त्याची गिट्टी उखडलेली असून, नागरिकांना रस्त्यावरून दुचाकीने तर सोडाच, ...

Work on Mukhyamantri Gram Sadak Yojana at Jitapur is slow | जितापूर येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम संथगतीने

जितापूर येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम संथगतीने

त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खडीकरण केलेल्या रस्त्याची गिट्टी उखडलेली असून, नागरिकांना रस्त्यावरून दुचाकीने तर सोडाच, पायी चालणेसुद्धा जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला यासंबंधी तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हिरपूर ते मोहब्बतपूर या रस्त्याबरोबरच जितापूर ते माना हा रस्ता मंजूर झाला होता. हिरपूर ते जितापूर रस्त्याच्या साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. याकडे शासनाने लक्ष घालून कामाला तत्काळ सुरुवात करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

फोटो: मेल फोटोत

Web Title: Work on Mukhyamantri Gram Sadak Yojana at Jitapur is slow