जिल्हाधिकारी मनपाच्या कामासाठी देणार दररोज तीन तास

By Admin | Updated: September 3, 2015 01:55 IST2015-09-03T01:55:48+5:302015-09-03T01:55:48+5:30

सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंतची वेळ निश्‍चीत.

For the work of the Collector's office, three hours daily | जिल्हाधिकारी मनपाच्या कामासाठी देणार दररोज तीन तास

जिल्हाधिकारी मनपाच्या कामासाठी देणार दररोज तीन तास

अकोला: जिल्हाप्रशासनाचे कामकाज सांभाळून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी महापालिकेचे प्रशासकीय काम करण्यासाठी सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंतची वेळ निश्‍चीत केली आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार सोपविण्यात आला. जिल्हाप्रशासनाच्या कामाचा आवाका लक्षात घेता, जिल्हाधिकारी श्रीकांत त्यांच्या कार्यालयातून मनपाचे प्रशासकीय कामकाज निकाली काढतील ही अपेक्षा होती. याठिकाणी मात्र जिल्हाधिकार्‍यांनी मनपाच्या कामात जातीने लक्ष देण्याचे जवळपास निश्‍चीत केल्याचे दिसून येते. आता दररोज सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत मनपाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय जी.श्रीकांत यांनी घेतला आहे. बुधवारी रात्री त्यांनी व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी विभाग प्रमुखांसोबत चर्चा केली.

Web Title: For the work of the Collector's office, three hours daily