शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:26 PM

शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.

अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून, सरसकट सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम १७ जूनपासून जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात येत होता. दोन हेक्टर शेतजमिनीची मर्यादा शिथिल करून, योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या कृषी आयुक्तांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत शेतजमीन क्षेत्राच्या मर्यादेची कोणतीही अट नसल्याने जिल्ह्यातील दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करून, शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना गत आठवड्यात पत्राद्वारे दिले. त्यानुषंगाने जिल्ह्यात सातही तालुक्यांतील प्रत्येक गावात दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत सुरू करण्यात आले आहे. माहिती संकलनाचे काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात शेतकरी कुटंबांची माहिती शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेले असे आहेत शेतकरी!तालुका                शेतकरीअकोला                ४९७९९अकोट                  ३९२७०बाळापूर               २३८७५बार्शीटाकळी         २०८४५पातूर                   १९२१७तेल्हारा                १८३६७मूर्तिजापूर            ३४३९८...........................................एकूण                  २०५७७१दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले १.१५ लाख शेतकरी यापूर्वीच पात्र!जिल्ह्यात एकूण ३ लाख २१ हजार ६७३ शेतकरी असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतजमीन असलेले जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९०२ शेतकरी यापूर्वीच पात्र ठरले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या व दुसºया हप्त्याची रक्कमदेखील जमा झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना