VIDEO- बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव
By Admin | Updated: August 28, 2016 16:29 IST2016-08-28T16:29:07+5:302016-08-28T16:29:07+5:30
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतात.

VIDEO- बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 - आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतात. त्याच प्रमाणे बंजारा समाजात तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ...कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते...सध्या श्रावण महिन्यात ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची धूम पाहायला मिळेल. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातल आहे...काय आहेय बंजारा लोकसंस्कृती?, कसं महत्व आहेय या समाजात तीजेच?...
पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या ह्या महिला...तुम्हाला वाटत असेल एखाद्या कार्यक्रमात अथवा लग्नात त्यांनी असा फेर धरला असेल... पण, हा उत्साह आहेय तीजेचा...बंजारा समाजातील तीज !... दृश्यातील हा उत्साह आहे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पारंपारिक डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपल आहे...हे वेगळेपण अगदी चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच आलं. तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच...बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज...मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो... श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते. याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्य होते ती बंजारा लोकगीतांनी...फ़क़्त मौखिक असणाऱ्या या गितांमध्ये कृष्णावर गीत म्हटली जातात...
दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत 'गौरी स्वरूप' धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत कृष्णाची गीते म्हटली जातात. या समाजातील लहान-मोठ्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने म्हणा की त्यांच्या पेक्षाही जास्त उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असतात, याकाळातील बंजारा लोकगीतं त्यांच्या संस्कृतीला समृद्ध आणि संपन्न करणारी असतात. तीज उत्सवाच्या काळात गाण्यात येणारी लोकगीतं आणि परंपरांमध्ये महिलांचं स्थान ठसठशितपणे समोर येतं. यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा समाजात आहेत. मूळच्या राजस्थानच्या बंजारा समाजाचा तिज उत्सव, महाराष्ट्रात कश्या पद्धतीने साजरा करतात, हे पाहण्या करीत राजस्थानचे बंजारा बांधव येत असतात.