महिला हक्क-कल्याण समिती आज अकोल्यात

By Admin | Updated: August 21, 2015 01:14 IST2015-08-21T01:14:05+5:302015-08-21T01:14:05+5:30

राज्य विधिमंडळाची महिला हक्क व कल्याण समिती शुक्रवारी अकोला दौ-यावर.

Women's rights-welfare committee today in Akolat | महिला हक्क-कल्याण समिती आज अकोल्यात

महिला हक्क-कल्याण समिती आज अकोल्यात

अकोला: राज्य विधिमंडळाची महिला हक्क व कल्याण समिती शुक्रवारी अकोला दौर्‍यावर येत आहे. महिला अधिकारी-कर्मचारी आणि मुलींसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाचा आढावा या समितीकडून जिल्हा परिषदेत घेण्यात येणार आहे. समितीप्रमुख आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वात १५ महिला आमदारांचा समावेश असलेली विधिमंडळ महिला हक्क व कल्याण समिती अकोला दौर्‍यात २१ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांसोबत चर्चा करणार आहे. सकाळी ११ ते १.३0 या वेळेत जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हा परिषद सीईओंची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

Web Title: Women's rights-welfare committee today in Akolat