- संतोष येलकरअकोला : सरकार महिलांना प्रतिमहिना चार हजार रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची अफवा पसरल्याने अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील महिलांची एकच झुंबड उडाली आहे. १८ ते ५९ वर्षे वयोगटातील महिलांना प्रतिमहिना चार हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. आर्थिक साहाय्य मागणीच्या अर्जाचा नमुनाही काहींनी तयार करून त्याची प्रति अर्ज २० ते ३० रुपये प्रमाणे विक्री सुरू केली. अकोला, अमरावती जिल्ह्यातील शेकडो महिलांनी हे अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. सरकारची अशी कोणतीही योजना नसताना जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत ते अर्ज स्वीकारण्यात आले. अशी योजना अस्तित्वात नसल्याने अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद केली.
अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी महिलांनी केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 05:16 IST