अतिक्रमण हटविण्यासाठी महिला सरसावल्या !
By Admin | Updated: March 2, 2017 18:19 IST2017-03-02T18:19:16+5:302017-03-02T18:19:16+5:30
गावातील महिलांच्या सहकार्यातून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी महिला सरसावल्या !
शिरपूर जैन (वाशिम)- मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे महिला सरपंच सुनिता मिटकरी यांनी गावातील महिलांच्या सहकार्यातून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. ढोरखेडा गावात अतिक्रमण झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला होता. या पृष्ठभूमीवर सरपंच सुनिता मिटकरी यांनी कन्याकुमारी ढवळे, जयश्री सावले, नंदाबाई गावंडे, अलका पवार, शशीकला ढवळे, वनिता सावळे, पार्वती सावळे आदी महिलांच्या सहकार्याने जेसीबी मशिनद्वारे गावातील अतिक्रमण हटावचा बुधवारी श्रीगणेशा केला. गुरूवारीदेखील काही प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी कोणताही पोलीस बंदोबस्त घेण्यात आला नाही, हे विशेष.