सरकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी प्रगती करावी - दिनेश तरोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 16:03 IST2019-08-27T16:02:55+5:302019-08-27T16:03:13+5:30
सुतार समाजाच्या महिला बचत गटांची आयोजित सामूहिक सभेमध्ये ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सरकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी प्रगती करावी - दिनेश तरोळे
अकोला : सरकार महिलांसाठी विविध प्रकारची योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटांच्या महिलांनी व्यवसाय करावा व आपल्या पायावर उभे राहून आपला व आपल्या परिवाराची प्रगती करावी, असे मत अकोला जिला परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी व्यक्त केले. सुतार समाजाच्या महिला बचत गटांची आयोजित सामूहिक सभेमध्ये ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रगति बचत गट, प्रेरणा बचत गट, आस्था बचत गट, राधाकृष्ण बचत गट, विश्वरचियता बचत गटांच्या महिलांची मासिक सभा म्हाडा कॉलिनी कौलखेड़मध्ये संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथि म्हणून अकोला जिला परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, उद्धव धोरण, विजय शेगोकर, किशोर वडतकर, श्रीकांतराव वडाळकर, विजय वडतकर, डा. पुरूषोत्तम दहीकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मनपा अंतर्गत स्थापन केलेले बीपीएलचे तीन गट वसुंधरा, विश्वास व एकता बचत गुटांच्या अध्यक्षा व सचिवांचा मान्यवरांच्या हाताने सत्कार करून साहित्याचे वाटप करण्यात आले. अतिथींनी अनेक उद्योगांच्या बाबतीत माहिती देऊन व्यवसाय सम्बधित समस्यांचे समाधान केले. कार्यक्रमामध्ये बचत गटांच्या महिला कुसुम बांबटकर, शकुंतला वडालकर, शेलुकर, उषा ताथुरकर, आशा ताथुरकर, उषा सुरते, कल्पना खेडकर, प्रतिभा दहीकर, वीणा लाडेकर, लाडेकर, ज्योती ताथुरकर, अनिता राजुरकर, अपर्णा राजुरकर, सीमा मानेकर, सविता मानेकर, मानेकर, संध्या बालापुरे, सुनीता खराटे, राऊत, रौंदलकर, सुनीता जामठकर, रेखा जामठकर, स्वाती महालकर, माधवी रूल्हे, जया शेगोकार, खेडकर सहित अनेक महिलांची उपस्थिति होती. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन जयमाला खेडकर यांनी केले.