शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

महिलांनी कार्यातूून महावितरणचा नावलौकिक वाढवावा - मुख्य अभियंता अनिल डोये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:27 IST

अकोला : महिला आपल्या कर्तुत्वामुळे आज सर्वच क्षेत्रात कार्यरत असून ,महावितरणमध्ये सुद्धा वरिष्ठ व्यवस्थापनापासून ते तंत्रज्ञ स्तरावर सेवा बजावीत असून त्यांनी आपल्या कार्य व कौशल्यातून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.

अकोला : महिला आपल्या कर्तुत्वामुळे आज सर्वच क्षेत्रात कार्यरत असून ,महावितरणमध्ये सुद्धा वरिष्ठ व्यवस्थापनापासून ते तंत्रज्ञ स्तरावर सेवा बजावीत असून त्यांनी आपल्या कार्य व कौशल्यातून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले. ते शुक्रवारी विद्युत भवन येथील सभागृहात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या विद्युत भवनातील सभागृहामध्ये आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अतिरिक्त कार्यकारी अभियंता कविता देशभ्रतार प्रमुख उपस्थिती अधीक्षक अभियंते पवनकुमार कछोट व राहुल बोरीकर, मार्गदर्शक डॉ ममता इंगोले, डॉ सीमा बक्षी व योगिता कछोट उपस्थित होत्या. महावितरणमध्ये अभियंते, अधिकारी कर्मचारी, तंत्रज्ञ या पदावर कार्यरत महिला भरीव कामगिरी करीत असून कायार्सोबतच त्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन सुद्धा मुख्य अभियंता यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला दिनाविषयक गीत राजेश्वरी जोशी व रोहिणी पाटील यांनी गायीले. यावेळी डॉ.ममता इंगोले, डॉ. सीमा बक्षी, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक शिवाजी तिकांडे तथा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वंदना बाबर, सूत्रसंचालन शुभांगी साबळे व सुजाता खराळकर तर आभार जोत्सना मांडले यांनी केले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी, गजेंद्र गाडेकर, राजीव रामटेके प्रभारी सहायक महाव्यवस्थापक सुमित बोधी, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, व उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, यांचेसह बहुसंख्य महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणWomen's Day Specialजागतिक महिला दिन