महिला, बालकल्याणच्या योजना मार्गी लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:18+5:302021-09-10T04:26:18+5:30

अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषद महिला ...

Women, set up child welfare schemes! | महिला, बालकल्याणच्या योजना मार्गी लावा!

महिला, बालकल्याणच्या योजना मार्गी लावा!

अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेत, समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मान्यता देण्यात आली. तसेच मुलींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन, पिको फाॅल मशीन आदी साहित्य वाटपाच्या योजना आणि महिलांना विविध प्रशिक्षणाच्या योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश महिला व बालकल्याण विभागाला या सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समिती सदस्यांसह जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Women, set up child welfare schemes!