महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता

By Admin | Updated: October 23, 2016 02:16 IST2016-10-23T02:16:23+5:302016-10-23T02:16:23+5:30

शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची माहिती.

Women police employee missing | महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता

महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता

अकोला, दि. २२- पोलीस दलाच्या मोटार वाहन विभागात कार्यरत असलेल्या दीपाली योगेश लखाडे या शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महिला पोलिसाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी नोंद के ली आहे. त्या शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत परत आल्या नाहीत. त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला; मात्र कुठेही दीपालीचा शोध न लागल्याने रामदासपेठ पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आहे.

Web Title: Women police employee missing