कार, दुचाकी व ट्रॅक्ट्ररच्या अपघातात महिला ठार

By Admin | Updated: July 11, 2017 01:35 IST2017-07-11T01:29:45+5:302017-07-11T01:35:56+5:30

पीडीकेव्ही जवळची घटना : दुचाकीचा चुराडा

Women killed in car, bike and tractor crash | कार, दुचाकी व ट्रॅक्ट्ररच्या अपघातात महिला ठार

कार, दुचाकी व ट्रॅक्ट्ररच्या अपघातात महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरने कार व दुचाकीला जबर धडक दिली. तीन वाहनांमध्ये घडलेल्या या विचित्र अपघातात गीताबाई आनंदराव सावळे ही महिला जागेवरच ठार झाली असून, त्यांचा पती व एक मुलगी गंभीर जखमी झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी तीनही वाहने ताब्यात घेतली आहेत.
मोठी उमरीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी आनंदराव परशुराम सावळे (७२) हे त्यांची पत्नी गीताबाई आनंदराव सावळे (६५) यांना घेऊन एम एच ३० एयू ३९८ क्रमांकाच्या दुचाकीने शिवणी येथून पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून उमरीकडे जाण्याच्या तयारीत होते.
यावेळी अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे भरधाव जात असलेल्या एम एच ३० जे ८६४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यानंतर या ट्रॅक्टरने पीकेव्हीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या एका कारलाही जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गीताबाई आनंदराव सावळे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचे पती आनंदराव सावळे व या ठिकाणी उभी असलेली मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील मुलगी रुबीना बी खा हे दोघे गंभीर जखमी झाले.
या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीचा चुराडा झाला असून, कारचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन जखमींना उपचारासाठी पाठविले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणातील ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Women killed in car, bike and tractor crash