बसमध्ये बेशुद्धावस्थेत महिला आढळली!
By Admin | Updated: May 2, 2017 01:38 IST2017-05-02T01:38:35+5:302017-05-02T01:38:35+5:30
अकोला: नेर येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसमध्ये सोमवारी दुपारी एक महिला प्रवासी बेशुद्धावस्थेत मिळून आली. महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बसमध्ये बेशुद्धावस्थेत महिला आढळली!
अकोला: नेर येथून औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसमध्ये सोमवारी दुपारी एक महिला प्रवासी बेशुद्धावस्थेत मिळून आली. महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेर ते औरंगाबाद एसटी बस सोमवारी दुपारी नवीन बसस्थानकावर आली. यावेळी बसमधील वाहक एम.डी. पुसदकर यांची नजर एका आसनावर गेली. या ठिकाणी एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने सिव्हिल लाइन पोलिसांना माहिती दिली.
ठाणेदार अन्वर शेख यांनी बसस्थानकावर पोहोचून महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. महिलेकडील रोख रक्कम व दागिने चोरण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने तिला बेशुद्ध केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे; परंतु चोरट्याचा हा प्रयत्न फसला असावा. पोलिसांनी महिलेकडील रोख १0 हजार ३१0 रुपये आणि सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत.