महिला- बालविकास जिल्हा मंडळाच्या अध्यक्ष पदावरून बोरकरची गच्छंती!
By Admin | Updated: October 30, 2015 01:36 IST2015-10-30T01:36:18+5:302015-10-30T01:36:18+5:30
शासनाच्या अधिसूचनेनुसार नियुक्ती १३ ऑक्टोबर रोजी रद्द.

महिला- बालविकास जिल्हा मंडळाच्या अध्यक्ष पदावरून बोरकरची गच्छंती!
अकोला: महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष पदावरून प्रा.गणेश बोरकरला काढण्यात आले आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा सल्लागार मंडळ अध्यक्ष पदावरील त्यांची नियुक्ती १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी शासनामार्फत प्रा. गणेश श्यामराव बोरकरने नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या, १३ ऑक्टोबर २0१५ रोजीच्या अधिसूचना अन्वये प्रा. बोरकरने महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या पदाचे प्रा. बोरकरने देण्यात आलेले अधिकार समाप्त करण्यात आले आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.