मद्यधुंदाने केली महिला व युवतींना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST2021-08-28T04:23:29+5:302021-08-28T04:23:29+5:30

गजानन नगर येथील गल्ली क्रमांक दाेनमधील रहिवासी तिवारी नामक महिला घरासमाेर उभी असताना आराेपी गाैतम खाडे याने त्यांच्या घराच्या ...

Women and girls beaten by drunkards | मद्यधुंदाने केली महिला व युवतींना मारहाण

मद्यधुंदाने केली महिला व युवतींना मारहाण

गजानन नगर येथील गल्ली क्रमांक दाेनमधील रहिवासी तिवारी नामक महिला घरासमाेर उभी असताना आराेपी गाैतम खाडे याने त्यांच्या घराच्या दरवाजात येऊन दारूची बाॅटल फाेडली. यावेळी तिवारी यांनी जाब विचारला असता आराेपीने त्यांच्या चेहऱ्यावर फायटरने मारहाण केली़ त्यानंतर लाथाबुक्क्यांनीही आराेपीने महिलेस मारहाण केली. या प्रकारामुळे तिवारी या गाैतम खाडेच्या पत्नीला हा प्रकार सांगून समजावत असताना गाैतम खाडे हा तलवार घेऊन आला व पुन्हा अश्लील शिवीगाळ करून धमक्या देऊ लागला़ त्यानंतर तिवारी यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज व साहित्याची ताेडफाेड करू लागला़ यावेळी मध्ये आलेल्या तिवारी यांची माेठी मुलगी व लहान मुलगी यांच्यासाेबत अभद्र वर्तन करू लागला़ यावेळी मुलींचे केस ओढून मारहाण करीत असल्याने शेजारी असलेल्या वानखडे, शिरसुळे, तिवारी यांनी मुलींची सुटका केली़ गाैतम खाडे याची पत्नी अलका खाडे हिनेही मारहाण केली़ या प्रकरणी तिवारी यांनी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ व ४ २५ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास डाबकी राेड पाेलिस करीत आहेत़

Web Title: Women and girls beaten by drunkards