विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 23, 2016 01:38 IST2016-05-23T01:38:14+5:302016-05-23T01:38:14+5:30

लोणार तालुक्यातील घटना.

The woman's death by going into the well | विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

सुलतानपूर (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील पारडी शिवारात शेळ्याला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेलेल्या महिलेचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना २२ मे रोजी दुपारी ३.३0 वाजता घडली आहे.
पारडी येथील रेणुका रमेश सिरसाट (३२) ही महिला पारडी शेतशिवारात १0 ते १५ शेळ्या चारत होती. दरम्यान, दुपारच्या वेळेला शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी रेणुका ही पारडी शिवारात असलेल्या सखाराम हरिभाऊ सिरसाट यांच्या विहिरीवर गेली. तेव्हा सुसाट्याचा वारा सुटल्याने रेणुकाचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. यामध्येच तिचा मृत्यू झाला. विहिरीच्या भोवती जमलेल्या शेळ्या पाहून शिवारातील नागरिकांना सदर महिला विहिरीत पडल्याचा संशय आला. तेव्हा नागरिकांनी विहिरीत गाळ टाकून मृत अवस्थेत महिलेला विहिरीतून बाहेर काढले. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत. रेणुकाच्या पश्‍चात पती व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

Web Title: The woman's death by going into the well