शॉक लागून महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: January 8, 2017 02:37 IST2017-01-08T02:37:36+5:302017-01-08T02:37:36+5:30

दानापूर येथील घटना.

Woman's death due to shock | शॉक लागून महिलेचा मृत्यू

शॉक लागून महिलेचा मृत्यू

दानापूर (अकोला), दि. ७- येथील संत रुपलाल महाराज चौकातील महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे आठ महिन्याच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरविले आहे.
याबाबतचे वृत्त असे की, प्रभाग क्र. ६ मधील संतरुपलाल महाराज चौकात राहणारे कैलास राऊत यांची पत्नी पुष्पा राऊत (२५) यांनी पाणी भरल्यानंतर नळाला लागलेली विद्युत मोटर काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान विद्युत मोटरमध्ये विजेचा प्रवाह आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला व त्या खाली कोसळल्या. इतरांनी आरडाओरड केली असता, नागरिकांनी धावपळ करीत त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या महिलेस मृत घोषित केले. प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Woman's death due to shock