अकोट फाइलातून महिला व तिची मुलगी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:13+5:302021-07-04T04:14:13+5:30

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मस्जिदजवळ रहिवासी असलेली ३३ वर्षीय महिला व तिची ९ वर्षीय मुलगी ...

The woman and her daughter went missing from the Akot file | अकोट फाइलातून महिला व तिची मुलगी बेपत्ता

अकोट फाइलातून महिला व तिची मुलगी बेपत्ता

अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मस्जिदजवळ रहिवासी असलेली ३३ वर्षीय महिला व तिची ९ वर्षीय मुलगी २१ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने अकोट फाइल पोलीस ठाण्यात केली आहे.

अकोट फाइल येथील रहिवासी शेख फिरोज शेख नजीर, वय ४० वर्षे हे २१ जून रोजी कामावर गेले असता त्यांची पत्नी रेहाना शेख फिरोज, वय ३३ वर्षे व शेख आलिया शेख फिरोज वय ९ वर्षे या दोघी घरीच होत्या. त्यानंतर शेख फिरोज हे कामावरून परत आले असता त्यांना दोघीही घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली असता त्यांची पत्नी रेहाना व मुलगी शेख आलिया या दोघीही काहीही न सांगता घरून निघून गेल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोट फाइल पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी या दोघींचा शोध सुरू केला असून कोणालाही काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: The woman and her daughter went missing from the Akot file