विनयभंग प्रकरणातील साक्षीदारास प्राध्यापकाची धमकी

By Admin | Updated: February 5, 2016 02:12 IST2016-02-05T02:12:40+5:302016-02-05T02:12:40+5:30

साक्षीदार असलेल्या परिचरास धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

Witness threatening professor in molestation case | विनयभंग प्रकरणातील साक्षीदारास प्राध्यापकाची धमकी

विनयभंग प्रकरणातील साक्षीदारास प्राध्यापकाची धमकी

अकोला: शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणात साक्षीदार असलेल्या ग्रंथालय परिचरास आरोपी प्रा. अनिल काळे याने अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात घडली.
गंगाधर प्लॉटमध्ये राहणारे आनंद नंदगोपाल चौबे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शिवाजी महाविद्यालयात ग्रंथालय परिचर म्हणून काम करतात. काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयातील संगीत विभागातील प्रा. अनिल काळे याने सहकारी प्राध्यापिकेचा विनयभंग केला होता. या प्रकरणामध्ये आनंद चौबे हे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पोलिसांनी काळेविरुद्ध गुन्हाही दाखल केला. त्यानंतर प्रा. काळे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास आनंद चौबे हे प्रयोगशाळा परिचर शिवशंकर मोडक यांच्यासोबत ग्रंथालयाच्या समोरील प्रांगणात उभे होते.
दरम्यान, संगीत विभागातील प्रा. अनिल काळे हा तेथे आला. त्याने चौबे यांना उद्देशून, तू माझ्या विरुद्धच्या प्रकरणामध्ये साक्षीदार आहे. मी तुला पाहून घेईल, असे म्हटले आणि अश्लील शिवीकाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. चौबे यांच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी प्रा. अनिल काळे याच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५0६, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Witness threatening professor in molestation case