गृहखात्याच्या अपर मुख्य सचिवांची साक्ष
By Admin | Updated: June 13, 2017 00:40 IST2017-06-13T00:40:54+5:302017-06-13T00:40:54+5:30
डीवायएसपी लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार प्रकरण

गृहखात्याच्या अपर मुख्य सचिवांची साक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला शहराचे तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीनारायण (आयपीएस) यांच्यावरील १९९३ मधील गोळीबारप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा गृह खात्याचे विद्यमान अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी साक्ष नोंदविण्यात आली.
रजपूतपुरा येथील रहिवासी रणजितसिंह चुंगडे यांनी तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीनारायण व त्यांच्या सहकाऱ्यांवर सिटी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात १९९३ मध्ये गोळीबार केला होता. या प्रकरणी लक्ष्मीनारायण यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी तथा गृह खात्याचे विद्यमान अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी साक्ष होती. श्रीवास्तव यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली आहे.