पश्‍चिम व-हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना

By Admin | Updated: December 22, 2014 00:20 IST2014-12-22T00:20:07+5:302014-12-22T00:20:07+5:30

१८ जिल्ह्यांत योजनेच्या ८0९ प्रकरणांचा निपटारा.

Without the protection of livestock insurance in West Wa-Bada | पश्‍चिम व-हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना

पश्‍चिम व-हाडातील पशुधन विम्याच्या संरक्षणाविना

संतोष वानखडे/ वाशिम : पशुधन विमा योजनेअंतर्गत राज्यात १८ जिल्ह्यांमधील पशुविम्याची ८0९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश या योजनेत नसल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राज्यात २00६-0७पासून केंद्रपुरस्कृत पशुधन विमा योजना राबविण्यात येते. सुरूवातीला सहा जिल्ह्यांत असलेली ही योजना २0११ पासून १८ जिल्ह्यांत लागू करण्यात आली. यामध्ये पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद विभागातील, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, नागपूर विभागातील भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती विभागातील केवळ यवतमाळ या एकमेव जिल्ह्यांचा समावेश आहे.
२0१२-१३ या वर्षात १८ हजार ७७४ जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याबाबतची १0५४ प्रकरणं निकाली काढून नुकसानभरपाईपोटी दोन कोटी ७२ लाख रुपये लाभार्थींना वितरित केले होते. २0१३-१४ या वर्षात जवळपास १0 हजार जनावरांचा विमा उतरविण्यात आला. ८0९ दावे निकाली काढून दोन कोटी २१ लाख रुपये लाभार्थींना वितरित करण्यात आल्याची नोंद राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या दप्तरी आहे. मात्र, दुसरीकडे या योजनेत पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेशच नसल्याने तेथे पशुपालकांना नुकसानभरपाई कशी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Web Title: Without the protection of livestock insurance in West Wa-Bada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.