कृषी पंपांना वीज पुरविणाऱ्या खांबांसह तारेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:23+5:302021-05-28T04:15:23+5:30

२७ मे रोजी रात्री विद्युत तारा व इलेक्ट्रिक खांब चोरीला गेल्याप्रकरणी येथील शेतकरी विठ्ठलराव तुळशीराम बोंडे रा. शेलू ...

Wire theft with poles supplying electricity to agricultural pumps | कृषी पंपांना वीज पुरविणाऱ्या खांबांसह तारेची चोरी

कृषी पंपांना वीज पुरविणाऱ्या खांबांसह तारेची चोरी

२७ मे रोजी रात्री विद्युत तारा व इलेक्ट्रिक खांब चोरीला गेल्याप्रकरणी येथील शेतकरी विठ्ठलराव तुळशीराम बोंडे रा. शेलू नजीक, नितीन विनायक परांजपे रा. मूर्तिजापूर, मोरेश्वर तुळशीराम बोंडे रा. शेलू नजीक, रावसाहेब शालिकग्राम बोंडे रा. शेलू यांनी उप मुख्य कार्यकारी अभियंता वीज वितरण मूर्तिजापूर यांना तक्रार दिली असून, त्यात महावितरणचा पुरवठा गेला असून, भविष्यात घुंगशी बॅरेजचे काटेपूर्णा नदीचे पाणी शेताला देण्याच्या उपयोगी पडेल म्हणून अंदाजे २० वर्षांपूर्वी शेतातून खांब व तारा नेण्यास परवानगी दिली होती. ते खांब झुकले असता, शेलू नजीक लाईनमन व दुर्गवाडा कार्यालयामधील कनिष्ठ अभियंता यांना दुरुस्ती करण्याबाबत तोंडी तक्रार केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खांबासह तारा चोरून नेल्या.

Web Title: Wire theft with poles supplying electricity to agricultural pumps