अकोला जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय विजेता

By Admin | Updated: August 31, 2014 00:09 IST2014-08-31T00:07:15+5:302014-08-31T00:09:48+5:30

१९ वर्षाआतील विद्यार्थीच्या गटात श्री शिवाजी महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले.

Winner of Shivaji College in Akola District Level School Volleyball Championship | अकोला जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय विजेता

अकोला जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय विजेता

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत महानगरपालिका क्षेत्रात शिवाजी महाविद्यालयाने १९ वर्षाआतील मुले व मुली दोन्ही गटाचे विजेतेपद मिळविले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेतील अंतिम सामने शनिवार ३0 ऑगस्ट रोजी खेळविण्यात आले. १९ वर्षाआतील मुले व मुलीच्या दोन्ही गटात श्री शिवाजी महाविद्यालयाने ज्योती जानोरकर विद्यालयाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
जिल्हा क्षेत्रात १४ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात परमानंद मालाणी कॉन्व्हेंट, मूर्तिजापूरने सेंट पॉल अकादमी, आकोट संघावर विजय मिळविला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात सेंट पॉल अकादमी अकोटने मलकापूरच्या बालाजी कॉन्व्हेंटचा पराभव केला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात लाल बहादूर शास्त्री विद्यालय आकोट संघाने तुळसाबाई कावल विद्यालयावर विजय मिळविला. विजेता संघांची निवड विभागीयस्तर स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत ठाकरे, अमोल ठाकरे, सुरज पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे होते. स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त साहेबराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाल सुरू आहेत.

Web Title: Winner of Shivaji College in Akola District Level School Volleyball Championship